महाराष्ट्राचे अस्सल मसाले

महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक वैशिष्टय़ांनुसार विकसित झाली आहे. मसाले आणि महाराष्ट्राचे नाते फार समृध्द आहे. उत्तम, सुवासिक, चविष्ट, रंगतदार, पदार्थाचा दर्जा उच्चवणारी चव अनुभवायची असेल तर लालबागचे जय महाराष्ट्र  मसाले हे  एकमेव ठिकाण आहे. प्रत्येक दिवसाला विशेष ठरतील असे जय महाराष्ट्र मसाले गेल्या ६८ वर्ष ग्राहकांना लज्जतदार, रुचकर पदार्थांची मेजवानी पुरवतात. 

या धकाधकीच्या जीवनात अनेकांना गोष्टी पटापट अनुभवायचा असतात किंवा झटपट हव्या असतात. अशा परिस्तिथीमुळे बाजारात रेडी टू मेड बनवता येतील असे पदार्थ खुप पहायला मिळतात. या पदार्थांमुळे अस्सल पारंपरिक चवीमध्ये कुठेतरी तडजोड होत असल्याचे दिसते. 

विशिष्ट पदार्थांसाठी विशिष्ट मसाले, हे आजचे समीकरण घराघरातून काटेकोरपणे पाळले जाते. व्यक्ती तितक्या प्रकृती, या उक्तीप्रमाणे घरा-घरानूसार मसाल्यातील वैविध्य आढळते. प्रत्येकाची स्वतंत्र पाक शैली असते. स्वतःची अशी खासियत असते. महाराष्ट्रातील शहरानूसार खाद्यपदार्थांमध्ये विविधता आढळून येते. त्याचप्रमाणे हि विविधता राज्यांमध्ये पहायला मिळते. गाव खेड्यात बनवले जाणारे मसाले, गरम मसाले, गोडा मसाला शहरी स्वादापेक्षा चवीने खुप वेगळा असतो. तशी चव फक्त गावखेड्यातच चाखायला मिळते. पण या समजाला जय महाराष्ट्र मसाल्यांनी चूक ठरवले आहे. तुम्हाला हवे असलेले घरगुती पध्दतीच्या मसाल्यांची निर्मिती जय महाराष्ट्र मसाल्यांनी केली आहे. 

मिरच्या खरेदी पासून अगदी घरच्या प्रमाणे व्यवस्थित उखळावर लाल तिखट मसाला तयार केला जातो. एखाद्या मसाल्यांची गुणवत्ता पारखायची असल्यास, त्या मसाल्याचा सुगंध, रंग आणि चवी वरून अस्सल मसाल्यांची ओळख पटवून घेऊ शकतो. 

मसाल्यांचा जेवणात कसा वापर करून घ्यायचा हे त्या-त्या घरातील गृहिणीला अगदीच ठाऊक असते. साहजिकच घरातील महिलांना जेवणात आपल्या चवीची छाप पाडायची असते. कुटुंबातील प्रत्येकाने तीच्या हातांनी बनवलेल्या रुचकर जेवणाची वाह वा मिळवायची असते. त्यामुळे महिलांसाठी मसाल्यांतील विश्वसनीय माहेरघर म्हणजे फक्त अस्सल, स्वादिष्ट,पारंपरिक जय महाराष्ट्र मसाले मसाले. जय महाराष्ट्र मसाले तुमच्या सोबतीला असतील मग रोजचेच पदार्थ बनतील अगदीच रुचकर. आता रोजच काही नवे बनवा आणि आपल्या प्रियजन्नांना खाऊ घाला. आवडीने जय महाराष्ट्र मसाल्यांच्या सोबतीने पदार्थ खा झक्कास.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *